देशातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे.
आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. यानंतर मागील आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती.
याबाबत आज ( १७ फेब्रुवारी ) निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे. तर, शिंदे गटाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.