पॉलिटेक्निकचा निकाल जाहीर

KolhapurLive


गडहिंग्लज, ता. २३ : राज्यातील पॉलिटेक्निकच्या हिवाळी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण  मंडळाने  (एमएसबीटीई) गेल्या महिन्यात या परीक्षा घेतल्या होत्या. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी  सोमवार ( ता. २७ ) अखेर मुदत आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापत्रक अद्याप कायम आहे. त्यामुळे हिवाळी  परीक्षा गेल्या महिन्यात पूर्ण झाल्या. सुरुवातीला प्रात्यक्षिक आणि त्यानंतर लेखी परीक्षा झाल्या. शेवटी ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या. एमएसबीटीईने  काल  (ता. २२) सायंकाळी संकेतस्थळावर हा निकाला जाहीर केला. विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांक टाकल्यावर निकाला पाहायला  मिळतो आहे. पहिल्या, तृतीय  आणी पाचव्या या नियमित सेमिस्टरचा निकाल लागला आहे.

पुढील आठवड्यात विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रके आपापल्या  संस्थेत मिळणार आहेत. दरम्यान, गुण पडताळणी आणि उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळण्याची प्रक्रिया उद्या (ता. २४) सुरू होत आहे. सोमवार अखेर विद्यार्थ्यांना लॉगइन आयडीतून हा अर्ज सादर करायचा आहे. त्याचे संबंधित शुक्ल संस्थेत भरावे लागणार आहे. या गुण पडताळणीचा निकाल पुढील महिन्यात १४ मार्चला जाहीर होईल. त्यानंतर  विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची  छायांकित पत्र मिळणार आहे. उन्हाळी  २०२३ परीक्षेची प्रक्रियाही  बुधवारपासून सुरू होत आहे.  विद्यार्थ्यांनी १२ मार्चअखेर  ऑनलाईन  परीक्षा अर्ज सादर  करावयाचे आहेत.