'दौलत' च्या निवृत्त कामगारांची उद्याा बैठक

KolhapurLive

चंदगड, ता. २३ : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्यातून १ सप्टेंबर २०१६ पूर्वी निवृत्त झालेल्या कामगारांची बैठक शनिवार (ता.२५) होत आहे. संघटनेचे जे. जी. पाटील, एस.आर. पाटील, एम. एन. पाटील, एस. के. पाटील, यांनी ही माहिती दिली. कारखाना साईटवरील  श्री गणेश  मंदिरात दुपारी बारा वाजता  होणाऱ्या बैठकीत वाढीव पेन्शन संदर्भात अर्ज भरले जाणार आहेत. कामगारांनी येताना पीएफची स्लीप, पीपीओ ऑर्डर, आधार कार्ड, यूएन नंबर, मोबाईल नंबर आदी माहिती घेऊन यायचे आहे.