रवळनाथ देवालयाची ८ फेब्रुवारी रोजी यात्रा

KolhapurLive

   चंदगडचे ग्रामदैवत श्री रवळनाथ देवालयाचे वार्षिक यात्रा मंगळवार दिनांक ७ ते १२ फेब्रुवारी अखेर होणार असल्याची माहिती देव रवळनाथ ट्रस्टचे सचिव आबासाहेब देसाई यांनी दिली. यात्रेनिमित्त गावामध्ये जोरदार तयारी सुरू आहे.तसेच मंदिर ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
          
        श्री देव रवळनाथ पब्लिक ट्रस्ट, चंदगड या गावचे लक्ष्मी यात्रा मंगळवार दि. ३१ जानेवारी व बुधवार दि. 1 फेब्रुवारी रोजी गदगेची लक्ष्मी तसेच श्री देव रवळनाथ वार्षिक यात्रा सालाबादप्रमाणे दि. ७ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे.
   
        मंगळवार दि. ७ रोजी लघुरुद्र,अभिषेक,गोंधळ, महाप्रसाद, रात्री गोंधळाची आरती,बुधवार दि. ८ रोजी उत्सवाचा मुख्य दिवस, महाआरती, पालखी, सासनकाठी, गुरुवारी दि. 9 रोजी देव चाळोबा यात्रा, शुक्रवारी दि. 10 रोजी देवी सातेरी, भावेश्वरी यात्रा, शनिवारी दि. ११ रोजी श्री देवी ईठलाई यात्रा, रविवारी दि. १२ रोजी जुन्या हरक्या फेडणे,असा कार्यक्रम होणार असून भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आव्हान देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे.