पुण्यात आज(शनिवार) ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. यामध्ये शिवराज राक्षे विजयी झाला.
माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड हा सिकंदर शेख याला पराभूत करून अंतिम फेरीत पोहचला होता. तर गादी विभागातून शिवराज राक्षे अंतिम फेरीत पोहचला होता, त्याने हर्षवर्धन सलगीर याचा पराभव केला होता.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ब्रिजभूषण सिंह, भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती.