महागाव येथील संत गजानन महाराज मल्टी स्पेशलिटी रुग्णालयात हृदयविकार रुग्णाच्या चिकिस्ता व उपचारासाठी स्वतंत्र कार्डियाक सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी अत्याधुनिक मशीनसह स्वतंत्र कॅथलॅबची उभारणी केला असून प्रदीर्घ अनुभव असलेले डॉक्टर टीम चोवीस तास येथे उपलब्ध असणार आहेत. तसेच लवकरच महात्मा फुले जीवनदायी व कर्नाटक सुवर्ण आरोग्य योजनेचा लाभ या रुग्णांना मिळणार असल्याची माहिती डॉ. यशवंत चव्हाण यांनी दिली.
गेली पंचवीस वर्षे गरजू व सर्वसामान्यांच्या उपचाराकरिता संत गजानना महाराज रुग्णालय नामांकित रुग्णालयापैकी एका आहे. या विभागातील हृदयविकार रूग्णांची गांभीर्य ओळखुन सामान्य रूग्णांना दिलास मिळावा यासाठी या सेंटरची सुरुवात केली आहे. नुकतीच या सेंटरमधून ट्रीपल वेसल असलेली अवघड व जोखीमेची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात यश मिळाले आहे. यासाठी नामवंत डॉ. रमेश माळकर यासह इतर तज्ज्ञ डॉक्टर्स व परिचारिकेच्या टीमची नियुक्ति केली आहे डॉ. माळकर हे एमबीबीएस कृष्णा मेडिकल सायन्स (कराड) डीएनबी मेडिसिन कोचीन (केरळ) तर डीएनबी कार्डिओलॉजी पुट्टप्रती (आंध्र प्रदेश) येथे शिक्षण पूर्ण करून दहा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले पंधरा हजार अँजिओप्लास्टी तर तीस हजारहून अधिक अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. याबरोबरच डॉ. प्रियांका पाटील, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, सुशांत पाटील यासह इतर डॉक्टरची टीम येथे आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. यशवंत चव्हाण यांनी केले आहे.