निटूर येथे विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू

KolhapurLive

चंदगड : निटुर येथे विहिरीतील पाणी काढत असताना पाय घसरूने पडल्याने तरुणीचा बुडून मृत्यू झाला तनवी परशुराम पाटील( वय १९)असे मृत्यू तरुणीचे नाव आहे. सोमवारी सकाळी सात ते दुपारी आडीच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी, तनवी ही जनावरांना पाणी आणण्यासाठी निटूर ग्रामपंचायतजवळ असलेल्या विहिरीकडे गेली होती. दरम्यान पाणी ओढत असताना पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. मुलीचे वडील परशुराम निगाप्पा पाटील यांच्या वर्दीवरून या घटनेची नोंद चंदगड पोलीस झाली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल महेश बांबळे करीत आहेत.