चंदगड, ता. २३ : दाटे (ता.चंदगड) येथील चंदगड तालुका कृषीमाल फलोत्पादन सहकारी संघाने शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत भरड धान्य खरेदीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या संस्थेने उच्चांकी नाचणा खरेदी केला. महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशनने याची दखल घेतली आहे . या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फलोत्पादन संघाचे अध्यक्ष उदयकुमार देशपांडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.