चंदगड मधील कोळी समाजाचा उद्या मोर्चा : प्रा. बसवंत पाटील

KolhapurLive


चंदगड, ता. २३ : जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता.२५) सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आदिवासी संघर्ष समितीचे विभागीय अध्यक्ष प्रा. बसवंत पाटील यांनी ही माहिती दिली.  महादेव कोळी जमातींच्या मागण्यांकडे शासनाकडून चाळीस वर्षे दुर्लक्ष केले जात आहे.  जातीच्या दाखल्यासाठी १९५० पूर्वीच्या पुराव्याच्या आग्रह, आप्तसंबंधी अट , क्षेत्रीय निर्बंधाची अट सांगून नाकारले जाते. शासनाच्याच  आदेशानुसार अशा प्रकारच्या दाखल्यांची गरज नाही. जिल्ह्यात केवळ महादेव कोळी जमात राहते. २०११ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या ३० हजार २०६ आहे. असे असताना जिल्ह्यातील महादेव कोळी समाजाला शासनाच्या सोयी, सवलतींपासून वंचित ठेवले जाते. मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.