चंदगड : करंजगाव येथे जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी दोघाजणांविरुद्ध चंदगड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकूश गोपाळ कांबळे ( रा. करंजगांव )
यांनी शुक्रवारी तक्रार दाखल केली. दीड वर्षांपूर्वी कांबळे यांनी दळवी यांच्या जेसीबी मशीनच्या सहाय्याने जमीन सपाटीकरण केली होती.
बुधवारी अंकुश कांबळे यांच्याकडे सात हजार रुपये भाड्याची जोडणी लवकर करा असे सांगितले. दरम्यान कांबळे यांनी ट्रॅक्टर पुढे घ्या असं म्हटल्याच्या कारणावरून तसेच काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्याविरोधात जलजीवन, नळजोडणी, स्ट्रीट लाईट, गटर बांधकाम व पाणंद रस्त्याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. हा विषय प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेतही येण्याची शक्यता होती. याचा राग मनात धरून दोघांनी जातिवाचक शिवीगाळ करत लोखंडी टॉमी व दगडाने मारहाण केली. अशी कांबळे यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास गडहिंग्लजचे विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले करीत आहेत.