आर्या पाटील हिची राज्यस्तरीय निवड

KolhapurLive

 कोल्हापूर... येथील जयसिंगपूर येथे झालेल्या शालेय विभागीय स्केटिंग स्पर्धेत आर्या पाटील हिने इनलाईन प्रकारात दोन सुवर्णपदके मिळवून तिची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे..या स्पर्धा दि ७व ८फेब्रुवारी २०२३रोजी विरार मुंबई येथे होणार आहेत.
    आर्या  ही वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीपासून खेळत आहे..यापुर्वीही  सलग 31तास,५१तास,१२१तास खेळून इंडिया बुक, एशिया बुक  , लिम्का बुकमध्ये तिच्या खेळाची नोंद झाली असून कोल्हापूर,सांगली, पुणे, बेंगलोर, मंगळूर, गुजरात, मुंबई येथे अनेक पदकांची ती मानकरी आहे. तिने आतापर्यंत ८०सन्मानचिन्ह,९०च्यावर पदकांची , प्रमाणपत्राची तिने कमाई केली आहे. क्रीडाक्षेत्रातील या यशाबरोबर शालेय वेगवेगळ्या वक्तृत्व, निबंध, चित्रकला,स्पर्धा परीक्षेतही दैदीप्यमान यश मिळविले आहे.ती सध्या जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे  इ.११वी त शिकत आहे.
     कु आर्या हिला प्राचार्य सागर नाईक, उपप्राचार्य विजय डोणे, क्रीडा शिक्षक, वर्गशिक्षक, शिक्षकवृंद, वडील अरूण पाटील, प्रशिक्षक डॉ महेश कदम,जयराम जाधव व अजितसिंग शिलेदार यांचे मार्गदर्शन लाभले