देसाई हॉस्पिटलमध्ये कर्नाटकच्या रुग्णांनाही मिळणार योजनांचा लाभ

KolhapurLive

गडहिंग्लज, ता. ३० : येथील देसाई हॉस्पिटलमध्ये आता कर्नाटकातील रूग्णांना सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट व आयुष्यमान भारत योजनेचा लाभ  मिळणार आहे. २५ जानेवारीपासून  या योजनांची अंमलबजावणी हॉस्पिटलमध्ये सुरू झाली आहे.  उपचारासाठी  येणाऱ्या कर्नाटक सीमाभागातील  रुग्णांना याचा लाभ होणार आहे. गडहिंग्लज उपविभागासह कर्नाटक सीमाभागातील रुग्णही हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. महाराष्ट्र सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित आहे. केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजनाही सुरू आहे. पण,  या योजनांचा लाभ कर्नाटकातील रूग्णांना मिळत नव्हता. दरम्यान, २५ जानेवारीपासून हॉस्पिटलमध्ये कर्नाटक शासनाची सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट व आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे‌. त्याचा फायदा सीमा भागातील बेळगाव जिल्ह्यातील रुग्णांना मिळणार आहे.