‘करो या मरो’च्या सामन्यात भारताला विजय आवश्यक

KolhapurLive

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (२९ जानेवारी) संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल. लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या मैदानावर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. कारण नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा सामना जिंकणेही जवळपास निश्चित मानले जात आहे.

वास्तविक, या मैदानावर आतापर्यंत झालेल्या सर्व टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेच विजय मिळवला आहे. या मैदानावर आतापर्यंत ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये येथे पहिल्यांदा सामना खेळला गेला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील या सामन्यात टीम इंडियाने ७१ धावांनी विजय मिळवला. यानंतर गेल्या चार वर्षात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा ३० धावांनी, त्यानंतर अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजचा ४१ आणि २९ धावांनी पराभव केला होता. भारताने श्रीलंकेचा ६२ धावांनी पराभव केला.