गडिंग्लज : औरनाळ येथेल पार्वती हायस्कूलमध्ये जनस्वास्थ दक्षता समिती कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने जनस्वास्थ अभियान सप्ताह राबविण्यात आला. याची सांगता झाली. या सप्ताहात पोस्टर्स तयार करणे, किशोरवयीन काळात घ्यावयची काळजी यावर व्याख्यान,कचऱ्यापासून खतनिर्मिती, सांडपाणी पुनर्वापर, सौरऊर्जेचा वापर, निधूर चुल, बायोगॅस आदीबाबत प्रबोधन करण्यात आले. अभियानासाठी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, गणपती पाटील, उमेश सावंत, बाळू कुंभार, वैशाली रेपाळ आदी सहकार्य लाभले.