चंदगड : बेळगाव- वेंगुर्ले रस्त्यावर नरेवाडी फाट्यावर झालेल्या अपघातात वरगाव नाईकवाडा येथील पुंडलिक केंचाप्पा नाईक याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. याबाबत माहिती अशी, पुंडलिक नाईक हे काम आवरून गावी दुचाकीवरून परत येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या गाडीला जोरदार टक्कर दिली. या धडकेत पुंडलिक नाईक हे जागीच ठार झाले. दरम्यान नाईक यांच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या सन्नाप्पा नाईक रा. नाईकवाडा वरगाव यांच्याविरूद्ध अशोक रामू नाईक यांच्या फिर्यादीवरून चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल सरंबळे करीत आहेत़