चंदगड : चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे प्रगती विकास कृषी सेवा केंद्रासमोर कल्याण मटका घेणाऱ्या विलास भिकू नाईक आणि भुजंग मष्णू नाईक या दोघां विरोधात गुन्हे अन्वेषण विभागामार्फत कारवाई केली. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास हलकर्णी येथे विलास नाईक हा कल्याण मटका घेत असता गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रशांत कांबळे, रवींद्र कांबळे आणि अमर शिरढोणे यांच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याकडील चार हजार बारा रुपये जप्त केले. विलास नाईक यास ताब्यात घेतले. मात्र बुकी भुजंग नाईक पोलिसांना सापडत नाही. तपास पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील करीत आहेत.