गाळपाबाबत उद्या ' गोडसाखर ' ची बैठक

KolhapurLive


गडहिंग्लज, ता.११ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा गोडसाखर कार्यक्षेत्रातील ऊस गाळप नियोजनाबाबत मंगळवारी (ता.१३) प्रादेशिक सहसंचालक (साखर)अशोक गाडे अध्यक्षतेखाली पालिकेच्या शाहू सभागृहात दुपारी बाराला होईल.

           गडहिंग्लज साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम बंद आहे. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या गळपाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. उसाचे वेळेत गाळत झाले नाही तर शेतकऱ्यांसमोरल अडचणी वाढणार आहेत.

   स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी प्रादेशिक सहसंचालकांना निवेदन देत लक्ष वेधले होते . त्यांची दखल घेत बैठक होत आहे. बैठकीसाठी आजरा संताजी घोरपडे, हेमरस, अथर्व- दौलत,इको केन शुगर्स, गडहिंग्लज साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक , शेती अधिकाऱ्यांची उपस्थिती राहण्याच्या सूचना दिली आहेत . प्रादेशिक उपसंचालक (साखर) डॉ. एस. एन. जाधव यांनी यांनी याबाबतचे पत्र दिले आहे.