शिवराज स्कूल अजिंक्य ...

KolhapurLive


गडहिंग्लज :  नगरपरिषद शिक्षण मंडळ गडहिंग्लज मार्फत आंतर शालेय फुटबॉल स्पर्धा सोमवार दिनांक १९/१२/२०२२ रोजी म. दु .श्रेष्ठी विद्यालयच्या मैदानावर पार पडल्या . स्पर्धेमध्ये आठ संघाचा सहभाग होता. शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल विरुद्ध छ.शिवाजी विद्यालय यांच्या मध्ये अंतिम सामना झाला. शिवराज स्कूलने 2-0 असा शिवाजी विद्यालयचा पराभव केला.
    
पूर्वाधात  दोन्ही संघानी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.  शिवाजी विद्यालय काडून  वेदांत धुंदरे , ऋतुराज आडसुळे यांनी चढाया सुरू केल्या. शिवराज्य विद्यालय  कडून अरिंजय हातरोटे, फराण नदाफ, साहील शेख, यांनी त्या चढाया परतावून लावल्या पूर्वाधाच्या शेवटी शिवराजकडून अरमान मिरच्या पास वर रणवीर कुराडेने हेड मारून गोल  नोंदवत एक गोलाची आघाडी मिळवून दिली. 
   
 उत्तरार्धात शिवराज  कडून धैरशिल वाघने मारलेला  जोरदार फटका शिवाजीविद्यालयाच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट आडवीला . शिवराजच्या चढाया शिवाजीचे बचावपट्टू जास्त काळ रोखू शकल्या नाहीत. अलोक पाटीलने उत्कृष्ट गोल नोंदवत शिवराज संघाला २-० असा विजय मिळवून दिला. सामन्यासाठी पंच म्हणून यासिन नदाफ, सिद्धार्थ दड्डीकर‌, सुरज हानीमनाळे, सुरज कोंडुसकर यांनी काम पाहिले. 

 विजयाचे शिल्पकार -- कर्णधार अरिंजय हातरोटे, शुभम कांबळे,  अरमान यळकुद्रे , अलोक पाटील, सामीन मणेर, अरमान मिरा,  अक्षय राठोड, साहील शेख, सुमित पाटील , श्रेयश पावले, धैरशील वाघ, गणेश चव्हाण, अभिषेक राठोड, फराण नदाफ, रणवीर कुराडे प्रशिक्षक किरण कावणेकर .