कन्नड रक्षण वेदिकेच्या राड्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट, ठाकरे गट- मनसे आक्रमक, कुठे आंदोलन?

KolhapurLive


बेळगावात (Belgaum) महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. कन्नड रक्षण वेदिका संघटनेने केलेल्या या राड्यानंतर महाराष्ट्रातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटक सरकारच्या आडमुठे धोरणावर महाराष्ट्र सरकार बोटचेपी भूमिका घेत असल्याची टीका ठाकरे गटाने वारंवार केली आहे. आता कन्नड रक्षण वेदिकेच्या हल्ल्यानंतर ठाकरे गटानेही आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर इचल करंजीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही आंदोलन केलं.

सांगली जिल्ह्यातील इचलकरंजी बस स्थानकात मनसेनं आंदोलन केलं. कर्नाटक गाडीच्या समोर केली निदर्शने महाराष्ट्रात कर्नाटकची एकही गाडी फिरू देणार नाही असा घेतला पवित्रा मनसेने घेतला आहे. कन्नड रक्षण वेदिकेने बेळगावात केलेल्या राड्याचा मनसेनं तीव्र निषेध केलाय. महाराष्ट्रातील मनसे आता जशास तसे उत्तर देणार, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी मांडली.

बेळगाव मध्ये सुरू असलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र एसटी प्रशासन सतर्क झाले आहे. जर कर्नाटक प्रशासन किंवा आंदोलन ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून राज्यांची सीमा ओलांडू दिली नाही तर महाराष्ट्रातून कर्नाटक कडे जाणाऱ्या बस थांबवल्या जातील. एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न पेटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पुन्हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर कोगनोळी जवळ शिवसेना ठाकरे गट आंदोलन करणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटकचे पोलीसही सीमेवर तैनात आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.