गडहिंग्लज : गडहिंग्लज अर्बन को-ऑप बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २५ डिसेंबरला मतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अमित गराडे हे काम पाहणार आहेत. १७ जागेसाठी ८ हजार सभासद मतदानास पात्र आहेत.
गडहिंग्लज अर्बन को-ऑप बँकेच्या १७ जागेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २९ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.३० नोव्हेंबरला अर्जाची छाननी होणार असून एक डिसेंबरला पात्र उमेदवाराची यादी जाहीर होणार आहे. १५ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे.तर २५ डिसेंबरला मतदान होणार आहे.२७ डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.
सर्वसाधारण ११, मुख्यालयापासून २५ किलोमीटरच्या बाहेरील शाखाप्रतिनिधी १, अनुसूचित जाती जमाती १, विमुक्त जाती, भटक्या जमाती अथवा विशेष मागास १, इतर मागास १, महिला प्रतिनिधी २, असे १७ संचालक निवडण्यात येणार आहेत. गडहिंग्लज, कडगाव, वडणगे ,जयसिंगपूर आणि कोल्हापूर शहरात ३ अशा ७ शाखा कार्यरत आहेत. अलीकडे आर्थिक घोटाळ्यामुळे गडहिंग्लज अर्बन बँक चर्चेत होती.पण आता सावरली असून गेल्या वेळी या बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले होते. यावेळी बिनविरोधासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत.