आजऱ्यात शनिवारी वंधत्व समस्या व निवारण शिबिर

KolhapurLive

आजरा
 : आजऱ्यात शनिवारी दि २६ नोव्हेंबर रोजी वंधत्व समस्या व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील माहेर हॉस्पिटल व इंदिरा आय. व्ही. एफ. सेंटर कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी व सल्ला शिबिर आयोजित करण्यात आले आहे.सकाळी ११ वाजता या शिबिराला सुरुवात होणार आहे. संबंधितांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.