उत्तुर :महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अश्विन भुजंग फाउंडेशनतर्फे जाधेवाडी (ता.आजरा) येथे झालेल्या रस्सीखेच स्पर्धेत जय हनुमान मंडळ ( करंबळी ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आश्विन भुजंग प्रेमी (उत्तुर) यांनी द्वितीय व अजिंक्य तारा मंडळ ( उतूर ) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितेश रायकर होते. यावेळी सरपंच अश्विनी कृष्णा शिंदे, उपसरपंच रघुनाथ सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ भुजंग, शिवाजी सावंत, रामदास कुंभार, आनंदा गाडीवड्डर, सतीश फाळके , मारुती मांडेकर , सुधीर सुपल, अनिल निऊगरे, आनंदा घंटे , कमलेश यासदे, अमोल बाम्बरे, जोतिबा पवार, विलास सावंत मधुकर भुजंग, पद्मजा भुजंग, सुरज जाधव, योगेश मळगेकर , रोहित मगदूम, संतोष गुरव , अनिकेत कांबळे उपस्थित होती.भुजंग यांनी आभार मानले.