नाळ फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद

KolhapurLive
    महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील गाव घडवण्याचे महान कार्य नाळ फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. गेल्या तीन वर्षात फाउंडेशन ने केलेले काम हे अतिशय कौतुकास्पद आहे आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन अवनी फाउंडेशनचे अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी कौलगे येथे केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आनंदराव जाधव होते.
     निमित्त होते नाळ फाउंडेशन कौलगे च्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे नाव फाउंडेशन वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळच्या सत्रात पार पडली. फाउंडेशनच्या वर्षातील कार्याचा आणि आर्थिक उलाढालीचा आढावा घेण्यात आला .सायंकाळी अनुराधा भोसले यांचे व्याख्यान आणि स्पर्धा परीक्षा ,दहावी-बारावी, सीईटी मध्ये यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम पार पडला.
    संजय पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉक्टर अमोल पाटील यांनी फाउंडेशनच्या वाटचालीवर प्रकाश टाकला फाउंडेशन गावाला नक्की प्रगतीपथावर नेईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी श्रद्धा चव्हाण ,सुहास हुंदळकर ,मिलिंद चव्हाण ,लक्ष्मण गाडीवड्ड, दीपिका पवार ,सुप्रिया रावण शर्वरी रावण ,संयोगिता रावण, प्रतीक येसरे ,सुदेश पवार ,रिलेश बारदेस्कर, ओम साने ,धनश्री केसरकर ,श्रावणी पाटील ,साक्षी दळवी ,सानिका पाटील ,रेवती पवार ,सई सावंत, तनिष्का शिंदे, सौरभ फलटणे ,यश पवार या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला .सत्कारमूर्ती श्रद्धा चव्हाण हिने फाउंडेशन प्रति कृतज्ञता व्यक्त केली .सागर पवार यांनी सूत्रसंचालन तर अरुण येसरे यांनी आभार मानले. यावेळी फाउंडेशनचे कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.