चंदगड तालुक्यात ४० ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून ज्या ग्रामपंचायतीचा सरपंच भारतीय जनता पार्टीचा निवडून येईल, त्या गावात ५० लाखाचा विकास निधी दिला जाईल अशी माहिती भाजप कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी दिली.
चंदगड तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गावागावाच्या विकासाला गती मिळावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. चाळीस ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून गावागावातील सर्वसामान्य मतदारांनी भाजपाच्या उमेदवाराला संधी देऊन गावच्या विकासाला चालना द्यावी शक्य असेल तिथे बिनविरोधक निवडणूक करून भाजपाच्या उमेदवाराकडे गावचा कारभार सोपवावा आणि गावच्या विकासासाठी भरघोष असा ५० लाखाचा खास विकास निधी मिळवावा.
भाजपाच्या निवडून येणाऱ्या सरपंचाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खास सत्कारही करण्यात येणार आहे . विकास निधी मिळवण्यासाठी भाजपाच्या सरपंचाला गावागावाने संधी द्यावी, असे आव्हान शिवाजीराव पाटील यांनी केले आहे .