गडहिंग्लज - कोल्हापूर येथे पोलीस परेड मैदान बावडा येथे झालेल्या कोल्हापूर जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेमध्ये कर्णबधिर प्रवर्गामध्ये गिजवणेतील साई मूकबधिर निवासी शाळेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांकाची आठ बक्षिसे , द्वितीय क्रमांकाचे चार बक्षीस व तृतीय क्रमांकाची चार बक्षिसे अशी एकूण १६ बक्षीस मिळवून जिल्ह्यात अव्वल क्रमांकात पटकाविण्यात आला.
यामध्ये बाळकृष्ण परीट - लांबउडी प्रथम, ज्योती कोटागी- गोळा फेक प्रथम वैभव कोळी लांबउडी प्रथम व ४०० मीटर धावणे प्रथम , सलोनी कांबळे - गोळाफेक प्रथम व २०० मीटर धावणे प्रथम कविता बडीगेर ४०० मीटर धावणे प्रथम अनुज हटकर २०० इतर धावणे प्रथम महादेव हिरेकुंडी २०० तर धावणे द्वितीय संदीप हरूगिरी १०० मीटर धावणे द्वितीय , सारिका रामनकट्टी लांबउडी द्वितीय परशुराम मुचडी गोळाफेक द्वितीय व १०० मीटर धावणे तृतीय, वैष्णवी पाटील ४०० मीटर धावणे तृतीय व गोळा फेक तृतीय आकाश कुंभार ४०० मीटर धावणे तृतीय अशी बक्षीस मिळाली.
संस्थेचे उपाध्यक्ष अध्यक्ष सतीश पाटील उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता राजपूत , क्रीडा शिक्षक दत्तात्रय कुंभार तसेच शैलजा पाटील ,छाया काळे ,गीता मगदूम सुप्रिया नीट्टरकर , राजकुमार देवाडे ,रूपाली तेली ,सुरेश कांबळे सतीश करबे, बाबासाहेब चौगुले यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी शितल शिंदे, गोपाळ मेनसे , बाळू पोवार व रावींद्र कांबळे यांचे प्रोत्साहन मिळाले.