अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियानचा मृत्यू झाला होता. दिशा सालियानचा बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला होता. याप्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव असल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला होता. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. आता याप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. दिशा सालियानचा अपघाती मृत्यू झाल्याचं सीबीआय तपासत समोर आलं आहे.
यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे. “भाजपाचे नेते आणि महिला नेत्यांनी आरोप केले होते, त्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणेचा अहवाल समोर आला आहे, तर तोंडाची थुंकी का उडवत होता. एक तरुण नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला,” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.