गुवाहाटी: के एल राहुल आणि रोहित शर्माची फटकेबाजी ऐन रंगात आली होती. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासूनच दोघा फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना फोडून काढलं होतं. सुरुवातीच्या ६ षटकात जवळपास ६० धावा धावफलकावर होत्या. रोहित-राहुलने आपले आक्रमक इरादे स्पष्ट केलेले असताना त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी मैदानात सापाने दर्शन दिलं. के एल राहुलच्या बेरक्या नजरेतून साप सुटला नाही. त्याने तत्काळ ही बाब पंचांच्या कानावर घातली. पंचांनी मैदानावरील कर्मचाऱ्यांना सांगून सापाचा बंदोबस्त केला. यादरम्यान खेळ १० मिनिटांसाठी थांबविण्यात आला होता.
आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा T20 सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा प्रकार ७ षटकं संपली होती तेव्हा समोर आला. त्यावेळी के.एल.राहुल ३३ धावांवर खेळत होता तर रोहित शर्मा ३१ धावांवर खेळत होता. पूर्ण संघाचे त्यावेळी ६८ धावा एकही बाद नव्हता. साप निघाल्यानंतर मैदानाबाहेरील कर्मचारी मैदानात धावत आले आणि त्यांनी या सापाला पकडलं. त्यानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला.