गांधीजींनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली.: डॉ. निलेश शेळके

KolhapurLive

जरळी: कोल्हापूर लाईव्ह वृत्तसेवा 
      सामान्य माणूस कामाची वर्गवारी करतो. श्रम करणे कमीपणाचे मानतो. पण कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते हे सिद्ध करून दाखवले. महात्मा गांधीजींनीच श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली असे मत डॉ. घाळी कॉलेजचे प्रा. डॉ. निलेश शेळके यांनी व्यक्त केले. दुंडगे ता गडहिंग्लज येथे आयोजित म. गांधी जयंती, लाल बहाद्दूर शास्त्री जयंती, संस्थामाता कै. सौ. सुशीला माधव कुलकर्णी यांचा स्मृतिदिन आणि पारितोषिक वितरण अशा संयुक्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर. जी. कुलकर्णी होते.
       प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय अविनाश कुलकर्णी यांनी केला.  डॉ. शेळके म्हणाले, गांधी विचार जोपासणारी ही जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे असे गौरवोद्गार काढले. सहा वाजता चरख्यावर २४ तास अखंड सूतकताईला प्रारंभ झाला. यावेळी गांधी ग्रंथ प्रदर्शन, गांधी विचार प्रदर्शन करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण झाले.  ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता सूतकताई सांगता होणार आहे. नंदिनी नाईक, राजेंद्र चौगुले डॉ. एन. डी. गुरव यांची भाषणे झाली. नंदिनी पाटील, गिरीजा सुतार, रोहिणी पाटील यांनी गांधीवंदना सादर केली.
          कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष बी. ए. संकपाळ, संचालक जी. एम. कोरी, शिवगोंडा पाटील, सरपंच ज्योती धनवडे, उपसरपंच अण्णासाहेब पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, माजी सरपंच सिदगोंडा पाटील, ऍड एस बी देसाई, प्रशांत देसाई, ओंकार घबाडे, किरण पाटील, केतन पाटील, नाना सावंत, बसवंत सुतार, राधाबाई दंडगीदास, शिवलीला पाटील, प्रा. सी. बी. कानडे, डी. एस. नवल्याळे, ए. आर. पाटील, जी. एस. घेजी, शंकर लोहार, के. बी. सुळकुडे, सचिन ओहरा, उदय तेलवेकर, एम. आर. संकपाळ, सोमगोंडा चिनगोडा, यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. 
     गणेश खरात यांनी सूत्रसंचालन केले तर बी जी मोकाशी यांनी आभार मानले.