एलॉन मस्क यांनी घेतला ट्विटरचा ताबा, मालकी हक्क मिळताच CEO पराग अग्रवालांची हकालपट्टी

KolhapurLive

एलॉन मस्क यांनी गुरुवारी ट्विटर करार पूर्ण केला असून कंपनीची मालकी मिळताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचा समावेश आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही हकालपट्टी होणार असून त्यामुळे ट्विटरच्या सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांपुढे रोजगाराचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी एलॉन मस्क यांनी एक ट्वीट करत ट्विटर विकत घेण्याच्या उद्देशाबाबत माहिती दिली होती. ‘‘भविष्यातील नागरिकांसाठी एक डिजिटल चौक असणे आवश्यक आहे, त्यामुळेच मी ट्वीटर खरेदी केले आहे. याठिकाणी विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करू शकतील. सध्या समाजमाध्यमे अतिउजवे आणि अतिडावे यात विभागली जाण्याची भीती आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल,’’ असे ट्वीट मस्क यांनी केले होते. तसेचत्यांनी ट्विटर मुख्यालयाला भेट देत ट्वीटरच्या बायोमध्ये ‘ट्वीट चीफ’ असेल लिहिले होते.
एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या व्यवहारातून काढता पाय घेतल्यानंतर हे प्रकरण डेल्वेअर चान्सरी न्यायालयापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर न्यायालयाने मस्क यांना शुक्रवापर्यंत करार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसर २८ तारखेला हा व्यवहार पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*

🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE

Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.

Admission Open for Offline & Online Batches.


👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप करा.

📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |

📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.