छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या मुगळीच्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद.....
मुगळी, दि. ३१:
चंदगडचा दौलत साखर कारखाना अतिशय सुरळीत सुरू होता. आमदार राजेश पाटील यांनी तो अट्टाहासाने बंद पाडला. तो कारखाना कोणालाच चालवूच द्यायचा नाही, हेच त्यांचे धोरण आहे. ते आमदार राजेश पाटील गोडसाखर काय चालवणार? असा रोखठोक सवाल शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्याणवर यांनी केला.
मुगळी ता. गडहिंग्लज येथे छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचार मेळाव्यात श्री गड्ड्याणवर बोलत होते. अध्यक्षस्थानी ????? होते.
भाषणात श्री. गड्ड्याणवार पुढे म्हणाले, आमदार राजेश पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच ते सभांमधून चिथावणीखोर वक्तव्ये करीत आहेत. गोडसाखरचे राजीनामा दिलेले बारा संचालक नालायक आहेत. त्याना वेशीतच रोखा, अशी भाषा वापरत आहेत.
*"याचेही चिंतन करा......."* आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लजला लागूनच असलेल्या कागल तालुक्यात पाच -पाच साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चांगल्या पद्धतीने चालत आहेत. मग गडहिंग्लज तालुक्यात एकमेव असलेला गोडसाखर का बंद पडतो? याचेही परीक्षण आणि चिंतन करा.
डाॅ. प्रकाश शहापूरकर म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करून त्यांच्या नेतृत्वाखाली गोडसाखरला ऊर्जितावस्थेत आणून पुनरूज्जीवन करू.
यावेळी व्यासपीठावर संग्रामसिंह कुपेकर, ऊदयराव जोशी, सौ. मंगल आरबोळे, नागेश चौगुले, रमेश रिंगणे, अरूण बेल्लद, विठ्ठल भमाणगोळ, नागेश चौगुले, बसवराज आजरी, अनिल कुराडे, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी माजी संचालक रमेश आरबोळे, प्रकाशराव चव्हाण, प्रा. किसनराव कुराडे यांचीही भाषणे झाली.
स्वागत व प्रास्ताविक हिराशुगरचे संचालक रमेश आरबोळे यांनी केले.
मुगळी ता. गडहिंग्लज येथे गोडसाखरच्या निवडणुकीसाठी छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचार मेळाव्यात बोलताना शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्याणवर व समोर उपस्थित सभासद.