निलजीच्या हिरण्यकेशी शेतीमाल संस्थेचा छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीला पाठिंबा

KolhapurLive



निलजीच्या हिरण्यकेशी शेतीमाल संस्थेचा छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीला पाठिंबा
गडहिंग्लज दि.31
      निलजी ता. गडहिंग्लज येथील हिरण्यकेशी शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्थेने गोडसाखरच्या निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीला पाठिंबा दिला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांना भेटून हा पाठिंबा जाहीर केला. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्याणवर, ॲड. विकासराव पाटील, उदयराव जोशी, सोमगोंडा आरबोळे, आर. एस पाटील यांच्यासह वरदशंकर वरदापगोळ, विकास पाटील, हणमंतराव पाटील, सुभाष कोरी, महादेव मोर्ती, भीमा धुमाज, तुकाराम शिंदे, बसवराज ककणवाडी, बभिशूल पाटील, रघुनाथ पाटील, सातगोंडा जिन्नानावर, मुन्ना बेडक्याळे आदी प्रमुख उपस्थित होते.
       निलजी ता. गडहिंग्लज येथील हिरण्यकेशी सहकारी शेती प्रक्रिया संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांना भेटून गोडसाखरच्या निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीला पाठिंबा दिला.