प्रा सुषमा पाटील यांना जिल्हा परिषदेचा प्रोत्साहनपर आदर्श शिक्षका पुरस्कार जाहीर
राधानगरी प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा प्रोत्साहनपर आदर्श शिक्षिका पुरस्कार मेन राजाराम कोल्हापूर च्या उच्च माध्यमिक विभागाकडील प्रा. सौ. सुषमा अरुण पाटील यांना देण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या समितीकडून दहा वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या पुरस्काराच्या त्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. आकुर्डे तालुका भुदरगड येथील सौ पाटील ह्या २००१ ते १२ या काळात गारगोटी येथील विनाअनुदानित इंग्रजी माध्यमिक शाळेत कार्यरत होत्या २०१२ ते १९ च्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या एम आर कॉलेज गडहिंग्लज येथे उच्च माध्यमिक विभागाकडे सेवा केली. त्यांना मराठी हिंदी समाजशास्त्र या विषयात अध्यापचा अनुभव आहे. सध्या त्या मेन राजाराम भवानी मंडप कोल्हापूर येथे उच्च माध्यमिक विभागाकडे कार्यरत आहेत.दरम्यान त्यांची जिल्हा व जिल्ह्याच्या बाहेर आतापर्यंत ४०० च्या वर विविध विषयावर व्याख्याने झाले आहेत. अध्यापनातील विविध प्रयोग, उपक्रमशील शिक्षका म्हणून त्यांची दखल घेऊन अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शासकीय व इतर सामाजिक कार्यक्रमात उत्तम निवेदिका म्हणून त्यांना दीर्घ अनुभव आहे या संपूर्ण कार्याची दखल घेऊन आता जिल्हा परिषदेच्या वतीने शासकीय समितीने मुलाखतीद्वारे त्यांची प्रोत्साहनपर आदर्श शिक्षिका म्हणून निवड केली आहे
🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*
🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE
Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.
Admission Open for Offline & Online Batches.
👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा.
📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |
📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.