गडहिंग्लज : करंबळी येथील दत्तप्रसाद बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ , आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के. बी.पोवार यांनी प्रस्ताविकात संस्थेचा थोडक्यात आढावा घेतला. तसेच पुढे काळात नूतन हॉलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, लहान मुलांसाठी संस्कार केंद्र व ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त सेवानिवृत्ती सभासदांचे व गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार मुश्रीफ यांनी स्पर्धा परीक्षा केंद्रास लागणाऱ्या पुस्तकांसाठी ५ लाखाचा निधी देण्याचे जाहीर केले. तसेच संस्थेने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. आमदार आसगावकर यांनी आपल्या फंडातून पुस्तके आणि प्रिंटर देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमास उदय जोशी , जि. प. माजी उपाध्यक्ष सतीश पाटील , मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार,उदय पाटील , व्यवस्थापक गणपती कावणेकर यांच्यासह सभासद , ग्रामस्थ उपस्थित होते