इतकी बदनामी करुनही राणांवर का फिदा आहात?,” बच्चू कडूंची शिंदे सरकारला विचारणा, म्हणाले “तुमचा अपमानच…”

KolhapurLive

राणांमुळे एवढी बदनामी झाली तरी सरकार का फिदा आहे ते माहिती नाही असं विधान अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाद मिटवण्यासाठी बच्चू कडू आणि रवी राणा यांना रविवारी रात्री ‘वर्षा’वर बोलावलं होतं. या बैठकीत जाण्यापूर्वी बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रवी राणांनी माफी मागण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं सांगितलं.

आता आम्ही चर्चेला बसणार आहोत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. चर्चा काय होते, समाधान काय होतं, त्यावर पुढचं ठरवलं जाईल. आमच्यावर झालेले आरोप फार गलिच्छ आणि खालच्या स्तराचे आहेत. त्यामध्ये कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर आपण पुढचा निर्णय जाहीर करु”, असं बच्चू कडू यांनी बैठकीला पोहोचल्यानंतर सांगितलं.

“रवी राणा यांनी इतकी मोठी बदनामी केली आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत”, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. “१ तारखेला आंदोलन होणार आहे. तोडगा निघाला नाही तर आंदोलन होणारच. कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे ते आल्यानंतर निर्णय घेऊ”, असं ते म्हणाले.