‘टाटा-एअरबस’,’सॅफ्रन’ सारखे प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले “भयंकर महत्वकांक्षा आणि…”

KolhapurLive

वेदान्त फॉक्सकॉन, टाटा-एअरबस आणि सॅफ्रन सारखे प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यात गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका़ सुरू असताना आमदार आदित्य ठाकरे यांनी या दोन्ही प्रकल्पांचा थेट उल्लेख टाळत शिंदे सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
”कृषी आणि उद्योग या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरील विश्वास उडाला आहे. गुंतवणूकदरांचा राजकीय स्थिरतेवरील आणि शेतकऱ्यांचा नैसर्गिक संकट काळात सरकार मदत करेल यावरून विश्वास उडाला आहे. भयंकर महत्वकांक्षा आणि ढासळलेली प्रशासकीय व्यवस्था हे महाराष्ट्राचं अपयश आहे”.
वेदान्त फॉक्सकॉन, टाटा-एअरबस आणि सॅफ्रन सारखे प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनीही आज पत्रकार परिषद घेत, ”एखादी कंपनी राज्याबाहेर जात असेल तर आपण समजू शकतो. मात्र, हे सातत्याने होत आहे. यावरून शिंदे-फडणवीस हे सरकार चालवण्याच्या लायक नसल्याचे सिद्ध झाले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.
🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*

🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE

Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.

Admission Open for Offline & Online Batches.


👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप करा.

📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |

📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.