गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी लवकरच संयुक्त बैठक’; सरकारचे आंदोलनकर्त्या कामगारांना आश्वासन

KolhapurLive

गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत सरकार आणि म्हाडा गंभीर नसल्याचा आरोप करीत बुधवारी मोठ्या संख्येने कामगारांनी आझाद मैदानावर आंदोलन केले. दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस धोरण जाहीर करावे आणि रखडलेल्या घरांच्या ताब्याचा प्रश्न त्वरित सोडवावा यासह विविध मागण्यांसाठी कामगारांनी आझाद मैदानावर आंदोलन केले. गृहनिर्माण विभागाच्या सचिव वत्सा नायर-सिंह यांनी कामगारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. घरांच्या प्रश्नाबाबत लवकरच गृहनिर्माण, म्हाडा, गिरणी कामगार आणि इतर संबंधित विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन नायर यांनी कामगारांना दिले.

गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व श्रमिक संघटनांनी बुधवारी सकाळी १० वाजता मोर्चाची हाक दिली होती. या मोर्चात मुंबईसह राज्यभरातील कामगार सहभागी झाले होते. कोन, पनवेल, बॉम्बे डाइंग आणि श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरांचा ताबा द्यावा आणि सर्व कामगारांना मुंबईतच घर द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. गृहनिर्माण विभागाने या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान,, या बैठकीत काही ठोस आश्वासन मिळाले नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी सर्व श्रमिक संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला.


🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*

🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE

Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.

Admission Open for Offline & Online Batches.


👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप करा.

📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |

📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.