न्यू शेपर्ड स्पोसक्राफ्टमध्ये एक रॉकेट आणि एक कॅप्स्युल होती. या कॅप्स्यूलला प्रक्षेपित करण्यात येते. लिफ्ट ऑफ झाल्यानंतर कॅप्स्यूलला पृथ्वीवर येण्यास 10-11 मिनिटांचा कालावधी लागतो. अंतराळा प्रवासी या काळात काही वेळासाठी स्वताला हलके झाल्याचे अनुभवू शकतात.
टेक्सास : अमेझॉनेचे संस्थापक जेफ बोजोस(Amazon founder Jeff Bozos) यांची अंतराळ कंपनी ब्ल्यू ओरिजिनने(Space company Blue Origin) गुरुवारी सहा जणांना अंतराळ पर्यटनासाठी(Space Tourism) अंतराळात पाठवले. कंपनीच्या स्पेसक्राफ्टने टेक्सासच्या लाँच साईटवरुन उड्डाण घेतले होते. हे स्पेसक्राफ्ट प्रवाशांना 107 किलोमीटर आकाशात घेूवून गेले आणि त्यानंतर पॅराशूटच्या माध्यमातून हे प्रवासी पुन्हा पृथ्वीवर परतले.
ब्ल्यू ओरिजिनने केला रेकॉर्ड
या फ्लाईटसह ब्ल्यू ओरिजिन कंपनीने नवा विश्वविक्रम केला आहे. पहिल्यांदाच इजिप्त आणि पोर्तुगालच्या नागरिकांनी अंतराळ पर्यटनात सहभाग नोंदवला. इंजिनिअर सारा साबरी अंतराळात सफर करणारी पहिली इजिप्तियन तर उद्योगपती मारिया फेरेरा अंतराळात जाणारे पहिले पोर्तुगालवासी ठरले. या प्रवासात अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला होता. त्यात ब्रिटन-अमेरिकन गिर्यारोहक वैनेसा ओ ब्रायन यांचाही समावेश होता.
दहा मिनिटांत पूर्ण झाला प्रवास
या अंतराळ स्थानकावरुन अवघ्या 10 मिनिटं 20 सेकंदात हा प्रवास पूर्ण झाला. या काळात स्पेस क्राफ्टचा वेग 2239 मील प्रतितास म्हणजेच 3603 किमी प्रतितास होता.
असा होता अंतराळाचा प्रवास
न्यू शेपर्ड स्पोसक्राफ्टमध्ये एक रॉकेट आणि एक कॅप्स्युल होती. या कॅप्स्यूलला प्रक्षेपित करण्यात येते. लिफ्ट ऑफ झाल्यानंतर कॅप्स्यूलला पृथ्वीवर येण्यास 10-11 मिनिटांचा कालावधी लागतो. अंतराळा प्रवासी या काळात काही वेळासाठी स्वताला हलके झाल्याचे अनुभवू शकतात.
10 कोटी रुपयांचे एक तिकिट
ब्यू ओरिजिनच्या स्पेस क्राफ्टच्या एका तिकिटाची किंमत 1.25 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 9,89,73,750 रुपये इतकी आहे. रिचर्ड ब्रैनसन यांची कंपनी वर्जिन गैलेक्टिकच्या तिकिटापेक्षा हे तिकिट जास्त महाग आहे.
गेल्यावर्षी सुरु झाले मिशन
ब्ल्यू ओरिजिन कंपनीच्या वतीने आत्तापर्यंत एकूण सहा वेळा अंतरिक्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 31 जणांनी हा अंतराळ प्रवास केलेला आहे. ब्ल्यू ओरिजिनने गेल्या वर्षी जुलैत बेजोससह तीन जणांना अंतराळात पाठवून या मिशनची सुरुवात केली होती.
अपोलो 11 च्या लँडिंगच्या दिवशी ब्लू ओरिजिन लाँच
जेफ बेजोस यांनी 2000 मध्ये ब्लू ओरिजिनची स्थापना केली होती. यानंतर न्यू शेपर्ड स्पेसक्राफ्ट एक दशकापासून प्रोटोटाइप्सची चाचणी करत होते. 20 जुलै 2021 japr अंतराळवीरांना घेऊन पहिल्या फ्लाईटने उड्डान घेतलं. हा दिवस अंतराळ प्रवासासाठी खास मानला गेला. कारण याच दिवशी 52 वर्षांपूर्वी अपोलो 11 (Apollo 11) चंद्रावर उतरलं होतं. ते रॉकेट आणि कॅप्सूलचं नाव 1961 च्या एलन शेपर्ड नावाच्या अंतराळवीरावरुन ठेवण्यातआलं. तो अंतराळात जाणारा पहिला अमेरिकन अंतराळवीर होता.