पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाने आपल्या राज्य भरातील जवळपास सर्व जिल्ह्यातील आमदारांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. यातच काही आमदारांची पहिल्यांदाच मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. शिंदे गटातील संभावित मंत्रिपदाची उमेदवार खालीलप्रमाणे आहे.         

मुंबई : यामिनी जाधव, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे 

ठाणे : प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर,श्रीनिवास वनगा 

उत्तर महाराष्ट्र : दादा भुसे, गुलाबराव पाटील, सुहास अण्णा कांदे 

पश्चिम महाराष्ट्र : शंभुराजे देसाई, अनिल बाबर, प्रकाश अबिटकर,  महेश शिंदे 

मराठवाडा : संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदिपन भुमरे 

कोकण : भरत गोगावले, उदय सामंत, दीपक केसरकर 

विदर्भ : संजय राठोड, संजय रायमुलकर 

शिंदे सरकारच्या या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात काही अपक्ष पक्षच नेतेही मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. यात प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू, आशिष जैस्वाल, नरेंद्र भोंडेकर आणि गीता जैन यांचा समावेश आहे. यामध्येच भाजपासून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर यांची नावे निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहेत. तसेच यामध्ये काही नवीन चेहऱ्यांना देखील भाजप संधी देऊ शकते.