गडहिंग्लज, आजरा तालुक्यात गेल्या साडेतेरा वर्षांपासून सुरू असलेल्या नेत्रदान चळवळीत आज १५० वे नेत्रदान झाले. गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील मारुती भिमराव पोवार (वय ६८) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. गिजवणे गावातील हे दुसरे नेत्रदान आहे.
२९ ऑक्टोबर २०१२ रोजी नेत्रदान चळवळीची सुरुवात झाली. चळवळीच्या प्रारंभानंतर २४ तासातच पहिले नेत्रदान झाले होते. गेल्या तेरा वर्षात २७ गावातून १५० व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. १५० हा केवळ आकडा नाही तर या माध्यमातून जनमानसात नेत्रदानाबाबत सजगता निर्माण झाल्याचे दिसून येते आहे.
गिजवणे गावात मधुकर मुळे यांचे पहिले मरणोत्तर नेत्रदान झाले होते. तीन वर्षानंतर मारुती पवार यांच्या झालेल्या नेत्रदानामुळे गिजवणे गावात चळवळीला नव्याने गती मिळाली आहे. मारुती पोवार पाटबंधारे विभागातून निवृत्त झाले होते. जोतिबा पोवार व नारायण पोवार यांचे ते वडील होत.
मारुती पोवार यांना
भावपूर्ण श्रद्धांजली...!
नेत्रदानासाठी संपर्क :-
अंकुर आय बँक, गडहिंग्लज
07498346880
-----------------------