अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनला राष्ट्रीय गौरव

KolhapurLive

अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन, गडहिंग्लजला ‘Emerging School of the Year’ राष्ट्रीय पुरस्कार; डॉ. अमोल पाटील यांना ‘Visionary School Owner of the Year’ सन्मान
गडहिंग्लज येथील अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर मानाचा तुरा मिळवला आहे. Six Sigma Healthcare Excellence Awards 2026 या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात संस्थेला “Emerging School of the Year” हा बहुमानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. व डॉ. अमोल पाटील यांना Visionary School Owner of the Year हा पुरस्कार प्राप्त झाला
हा सन्मान भारतीय नौदलाचे सर्वोच्च अधिकारी दिनेश कुमार त्रिपाठी (भारतीय नौदल प्रमुख) , कारगिल युद्धातील शूरवीर कॅप्टन योगेंद्रसिंग यादव (परमवीर चक्र), बाहुबली चित्रपटातील भल्लाळदेव म्हणून प्रसिद्ध अभिनेते राणा डगुपती* यांच्या हस्ते यांच्या नवी दिल्ली येथे आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनची निवड ही विशेष ठरली आहे.
संस्थेचे संस्थापक डॉ. अमोल पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि सक्षम मार्गदर्शनाखाली संस्थेने अल्पावधीतच गुणवत्ता, नवकल्पना आणि विद्यार्थीकेंद्री शिक्षण पद्धती यांचा उत्कृष्ट संगम साधला आहे. स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दिलेला भर यामुळे संस्थेने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक यश नव्हे, तर नैतिक मूल्ये, शिस्त आणि आत्मविश्वास यांचीही जाणीव करून देण्याचे कार्य संस्थेमार्फत सातत्याने केले जाते. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामस्वरूप संस्थेला हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या यशामुळे गडहिंग्लज शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, संपूर्ण परिसरातून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशात संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व सहकारी यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.