गडहिंग्लज. स्थानिक नागरिकांच्या आर्थिक सबलीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या “आधार नगरी सहकारी पथसंस्थे” चे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
या पथसंस्थेचे उद्घाटन निडसोशी मठांचे पूज्य स्वामीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर, व्यापारी, नागरिक आणि सभासद यांच्या मोठ्या उपस्थितीत रिबन कटिंग करून पथसंस्थेची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी स्वामीजींनी मार्गदर्शन करताना सांगितले की,
“सहकार क्षेत्र हे समाजाच्या आर्थिक प्रगतीचे मजबूत माध्यम आहे. योग्य व्यवस्थापन आणि पारदर्शकतेच्या जोरावर ही संस्था नक्कीच लोकांचा विश्वास संपादन करेल.”
पथसंस्थेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना बचत, कर्ज सुविधा, तसेच आर्थिक नियोजनासाठी मदत मिळणार असून, ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
कार्यक्रमास संस्थापक सदस्य व संचालक मंडळातील
डॉ. अमोल पाटील, मुरारी चिकोडे, शैलेश पेडणेकर, प्रकाश माळी, जितेंद्र रणनवरे, वासिम नाईकवाडे, राजेंद्र पात्रे, रोहन माजगावकर, अभिजित घोरपडे, सुचित्रा चिकोडे, पूजा पाटील
यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात संस्थेचे
पदाधिकारी यांनी पथसंस्थेचे उद्दिष्ट, भावी योजना आणि ग्राहकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.