"पालकांचा सार्थ ठरतोय विश्वास...अभिनव आहे सर्वात खास"

KolhapurLive

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील अभिनव सायन्स अकॅडमीने जेईई मेन्स 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेच्या तब्बल 47 विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्रता मिळवून संस्थेचा लौकिक अधिक उंचावला आहे.
यामध्ये चिन्मय कुर्बेट्टी याने 99.80 पर्सेंटाइल मिळवत अव्वल कामगिरी केली. त्याचप्रमाणे कुनाल गाड (99.45 पर्सेंटाइल) आणि अथर्व पाटील (99.27 पर्सेंटाइल) यांनीही उत्कृष्ट यश मिळवले.
तसेच आदित्य पाटील (98.08 पर्सेंटाइल), अथर्व पाटील (98.00 पर्सेंटाइल), श्रेयश पाटील (97.66 पर्सेंटाइल) आणि अंशुमान कांकणवाडी (97.03 पर्सेंटाइल) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
संस्थेचे प्रमुख डॉ. अमोल पाटील सर व त्यांच्या संपूर्ण टीमच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
“पालकांचा सार्थ ठरतोय विश्वास… अभिनव आहे सर्वात खास…” या ब्रीदवाक्याप्रमाणे अभिनव सायन्स अकॅडमीने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे.
दरम्यान, संस्थेमध्ये इयत्ता ११ वी सायन्स (2026-27) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
पत्ता : अभिनव कॅम्पस, गडहिंग्लज-गारगोटी रोड, लिंगनूर, ता. गडहिंग्लज – 416502
संपर्क : 9405138212 / 9503049650