शनिवार दि.23/08/2025 रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे गडहिंग्लज दौऱ्यावर येणार असून शहरातील ते विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.
या प्रसिद्धी पत्रकात शनिवारी सकाळी 11.00 वाजता मंत्री मुश्रीफांच्या हस्ते संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप, तर 4.00 वाजता गडहिंग्लज कला अकादमी मधील बाल कलाकारांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज मंडई भडगाव रोड येथे, आणि 5.00 वाजता डॉ. घाळी महाविद्यालयातील राज्यस्तरीय वक्तृत्व आणि काव्य वाचन स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा, असे विविध कार्यक्रम मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहेत. यांची नोंद सर्व नागरिक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.