अभिनव ग्लोबल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज येथे समुपदेशन पर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रामदास इंगवले साहेब यांनी चांगले ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर व्यसनापासून दूर राहावे असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या समोर केले. येथील अभिनव ग्लोबल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज मध्ये बोलत असताना बाल गुन्हेगारी व कायदा आणि निर्भया पथक या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय प्रा. संदीप पाटील सर यांनी करताना इंगवले साहेब यांची सेवा ही पुणे इचलकरंजी नंतर गडहिंग्लज येथे कार्यरत असल्याबाबतचे सांगितले. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अमोल पाटील उपस्थित होते इंगवले साहेबांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात वाहतुकीचे नियम व्यसनाधीनता अन्न प्रशासन व कायदा नशा व आपली पदार्थ यापासून कशाप्रकारे दूर राहावे हे महत्त्व पटवून दिले निर्भया पथकाची गरज आहे हे उदाहरणासह स्पष्टीकरण दिले विद्यार्थी प्रति डिसिप्लिन किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी पटवून सांगितले अध्यक्षीय भाषणात डॉ. अमोल सर यांनी मुलांना नशीब आजमावताना हातून कोणताही गुन्हा घडू नये तसेच कोणतेही व्यसन लागू नये हे सांगतानाच मोठा माणूस मोठा कसा होतो हे त्यांनी इंगवले साहेबांच्या वेळेच्या उपस्थितीवरून पटवून दिले या कार्यक्रमासाठी संस्थेचे सेक्रेटरी संतोष पाटील, प्रा हेमंत संकपाळ, प्रा. प्रशांत कळके, मुख्याध्यापक श्री अभिजीत पाटील, श्री अजित पवार, सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.