शिवराज महाविद्यालय व ताज हेल्थ केअर केमिकल्स प्रा.लिमिटेड रत्नागिरी यांच्यात सामंजस्य करार

KolhapurLive

गडहिंग्लज :येथील शिवराज महाविद्यालय व ताज हेल्थ केअर केमिकल्स प्रा.लिमिटेड रत्नागिरी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे संचालक प्रा.विश्वजित कुराडे यांची उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.एम.हसुरे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी महाविद्यालयातील बी.एस्सी.व एम.एस्सी केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना ताज हेल्थ केअर केमिकल्स प्रा.लिमिटेड यांच्यावतीने विशेष कौशल्यपूर्ण शिक्षण व प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही देण्यात आली आहे याचा लाभ आमच्या महाविद्यालयातील होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ताज हेल्थ केअर केमिकल्स प्रा.लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री डी.ए.जाधव, मॅनेजर सोफियान पारकर, श्री विकास गडवे यांनी कंपनीसाठी आवश्यक १० विविध पदासाठी महाविद्यालयातील बी.एस्सी.व एम.एस्सी केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांच्या कँपस इंटरव्हू घेतल्या. यावेळी महाविद्यालयातील केमिस्ट्री विभागाचे सर्व प्राध्यापक, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.नितीन चव्हाण यांनी आभार मानले.