गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाचे ग्रंथालय परिचर श्री व्ही.आर.टेंबरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते. संस्थेचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे व प्राचार्य डॉ.एस.एम.कदम म्हणून यांची उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल श्री संदीप कुराडे यांनी केले. या कार्यक्रमात श्री व्ही.आर.टेंबरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार सचिव डॉ.अनिलराव कुराडे, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री विनोद बिलावर, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, श्री सुरेश मोरबाळे, श्री अनिल कलकुटकी यांनी आदींनी आपल्या मनोगतातून व्ही.आर.टेंबरे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती श्री व्ही.आर.टेंबरे यांनी आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सचिव डॉ.अनिलराव कुराडे, यांनी अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयात श्री व्ही.आर.टेंबरे यांनी कार्यतत्पर राहून प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यामुळे शिवराज विद्या संकुल ज्ञानदानाच्या कार्यात समाजासाठी आजही तत्पर कार्य करीत आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे व्यक्त करून त्यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त दिल्या. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनीही श्री टेंबरे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, टेंबरे कुटुंबीय, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अशोक मोरमारे यांनी केले.