गडहिंग्लज : शहरातील सुप्रसिद्ध
संघर्ष ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त दिनांक २९ एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मागील २१ वर्षांपासून हा उपक्रम संघर्ष ग्रुप सातत्याने राबवत आहे.
या कार्यक्रमासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार शिवाजीराव पाटील (चंदगड), तसेच गोकुळ दूध संघाचे संचालक नावेद मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मिरवणुकीत शिवतांडव नृत्य, अघोरी, २१ भव्य हनुमान मूर्ती, आदित्य योगी महादेव मूर्ती, चंदगड
शिमगो उत्सव, हत्ती-घोडे, विजापूर येथील बाहुबली देखावा, सिद्धिविनायक ऑडिओ अशा विविध
आकर्षणांचा समावेश आहे. याशिवाय महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती, बैलजोडी व वारकरी संप्रदायाचीही सहभागीता राहणार आहे.
मंगळवार, दिनांक २९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता मधु श्रेष्ठी विद्यालय, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथून मिरवणुकीला सुरुवात होईल. सर्व नागरिकांनी या मिरवणुकीस उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष गुंडू पाटील व संघर्ष ग्रुप संस्थापक अध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले आहे.