महाराष्ट्रात भाजपाची पीछेहाट झाल्यानंतर फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं”!

KolhapurLive

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून देश पातळीवर भारतीय जनता पक्षप्रणीत एनडीएला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्रात भाजपाला अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आलं. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची २०१९ च्या २३ जागांवरून ९ जागांपर्यंत पीछेहाट झाली. तसेच, महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचं अपयश हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मोठं भाष्य केलं आहे.