गडहिंग्लज : ज्यावेळी ब्रिटीशानी मुंबई बैंगलोर रेल्वे मार्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तत्कालीन छत्रपती राजर्षी शाहू महाराज्यानी हा रेल्वे मार्ग व्हाया कोल्हापूरमार्गे नेण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर घटप्रभा सावंतवाडी व्हाया चंदगड घटप्रभा आंबोली व्हाया गडहिंग्लज, कोल्हापूर कोकण व्हाया गगनबावडा आणि कोल्हापूर- बेळगाव व्हाया संकेश्वर अशा चार उप रेल्वे मार्गाचेआराखडे तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असा आग्रह शाहू महाराजांनी घरलेला होता. परंतु दुर्दैवाने त्यांच्या वयाच्या फक्त ४८ व्या वर्षी अकाली निधन झाल्यामुळे त्यांचे हे स्वप्न अपुरे राहिले त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर शासकीय यंत्रणांनी या मार्गाचे सर्व्हेक्षण केलेले आहे. परंतु अध्यापी पूर्तता केली नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने आपण स्वतः लक्ष घालावे व थोरल्या महाराजांचे स्वप्न साकार करावे व वाहतूक क्रांती घडवून आणावी अशी मागणी थोर विचारवंत, लेखक प्रा. किसनराव कुराडे यांनी गडहिंग्लज येथे खासदार शाहू महाराज यांना निवेदनाव्दारे संपर्क दौऱ्यावेळी केली.