९७ मुलामुलींचा सहभाग
आशिया खंडामध्ये ए एफ सी ग्रासरूट्स दिवस व सप्ताह साजरा करण्यात आला, याचे अवचित साधून एटी फाउंडेशन, या संस्थेने, अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी च्या साहाय्याने गडहिंग्लज, आजरा व भुदरगड या तालुक्यातील धामणे, गडहिंग्लज, झुलपेवाडी, कडाळ, अर्दाळ ह्या खेडेगावातील मुलामुलीं मध्ये फुटबॉल खेळाविषयी आवड व जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे फुटबॉल संबंधित मनोरंजक खेळ व सामूहिक उपक्रम राबविले.
ए टी फाउंडेशन च्या संबंधित गावातील लीडर्स यांनी नियोजनपूर्वक हा उपक्रम संबंधित गावांमध्ये राबविला. मे महिन्याच्या सुट्टी मधे मुलामुलींनी छान आनंद लुटला. या उपक्रमांमध्ये ९७ मुलामुलीं सहभाग नोंदीवला असून सर्व उपक्रमांचा तपशील अखिल भारतीय फुटबॉल संघटना (एआय एफएफ) व आशियायी महाफुटबॉल संघटना (एफसी) यांना पाठवण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल कोच व एटी फाउंडेशन आणि अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी च्या संस्थापिका, अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लिडर्स अक्षय पावले, हर्षिता चव्हाण, सृष्टी शेळके, श्रावणी पावले, अंजली पुंडपळ, आकांक्षा माळगी, ज्ञानेश्वरी मगदूम, सिद्धी भोसले, श्रुती दिवटणकर, सुलक्षणा पावले, वैभवी पाटील, सानिका रेडेकर, सम्राट चव्हाण, शिवतेज पाटील यांनी परिश्रम केले.
फुटबॉल हा सामूहिकरित्याने खेळला जाणारा खेळ असल्यामुळे तरुण मुलामुलीनं मधे जीवनकौशल्ये विकसित करण्यास मदत होते तसेच समाजातील सर्वच मुलामुलींना मानसिक व शारीरिक संतुलन बाळगणे हल्लीच्या युगामधे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे असे संस्थापिका, अंजू तुरंबेकर यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यामधील गावांमध्ये फुटबॉल खेळ रुजविण्यासाठी एटी फाउंडेशन आणि अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी द्वारे प्रयत्न करत राहू अशी त्यांनी ग्वाही दिली.